"लकडी की काठी,
काठी पे घोडा..." हे
गाणं आपल्यापैकी
अनेकांनी ऐकलं
असेल आणि अनेकदा
गुणगुणलंही असेल.
खरंतर, लहानपणी
अगदी बोबडे बोल
बोलण्याच्या वयातच
हा घोडा या ना त्या
रूपाने आपल्याला
दिसतो. कधी गाण्यांतून,
बडबडगीतांमधून
तर कधी प्रत्यक्ष.
अर्थात, प्रत्यक्ष
म्हणजे खरा घोडा
पहायला मिळो ना
मिळो, पण खेळण्यातल्या
लाकडी घोड्यावर
बसण्याचा आनंद
तर अनेकांनी लुटला
असेल. मग नंतर
कधी वरातीचा घोडा,
बग्गीला जोडलेले
घोडे, बागेत लहान
मुलांना पाठीवर
बसवून फिरवून आणणारे
घोडे..अनेक ठिकाणी
तो भेटत राहतो.
त्याच्यावर रपेट
करण्याची हौस अनेकांच्या
मनात असते. घोड्याचं
ते उमदं रूप, त्याचा
वेग, त्याच्यावर
स्वार होण्यातला
थरार..हे सगळं मनात
घर करून असतं कुठेतरी.
मग अशा या घोड्याशी
मैत्री करायला
काय हरकत आहेॽ
हो मैत्रीच.
त्याच्याशी प्रेमाने
वागलं तर खूप छान
मैत्री होते आपली
त्याच्याशी. त्याच्या
वागण्यातून आपल्याला
त्याचे मूड्स सुद्धा
कळतात. आणि हे एकतर्फी
नसतंच. घोड्यालासुद्धा
माणसं ओळखता येतात.
घोडेस्वाराच्या
नुसत्या स्पर्शातून
घोड्याला त्याचा
स्वभाव कळतो आणि
मग त्या घोडेस्वाराशी
कसं वागायचं ते
पण घोडा ठरवतो.
घोडे खोडकर, व्रात्यसुद्धा
असतात बरं का. कधीकधी
एखाद्याला अजिबात
दाद देत नाहीत
आणि कधीकधी आपल्या
लाडक्या घोडेस्वारासमोर
इतके मवाळपणे वागतात
की आश्चर्य वाटावं.
घोडे हसतात, उदास
होतात, हक्कसुद्धा
गाजवतात.
तर अशा या उमद्या
जनावरावर स्वार
व्हायला शिकायचं
म्हणजेच horse riding करायला शिकायचं
ते नुसतं छंद म्हणून
का?
अजिबातच नाही.
घोडेस्वारी हा
एक उत्तम व्यायाम
आहे. घोडेस्वारीमुळे
मणक्यांचं आरोग्य
चांगलं राहतं,
रक्ताभिसरण व्यवस्थित
होतं, हृदयाच्या
ठोक्यांचे प्रमाण
वाढते. त्याशिवाय,
आत्मविश्वास वाढतो,
निर्णयक्षमता
चांगली होते. एकंदरीतच,
शरीराचे आणि मनाचे
आरोग्य उत्तम ठेवायचे
तर घोडेस्वारीचा
खेळ खूपच उपयोगी
ठरतो. विशेष म्हणजे
घोडेस्वारी शिकण्यासाठी
वयाची अट नसते.
वयाच्या सहाव्या
वर्षापासून ते
अगदी कुठल्याही
वयोगटातल्या व्यक्तीला
घोडेस्वारी शिकता
येते.
घोडेस्वारीमध्ये
career च्या संधीही मिळू
शकतात. विशेषतः
परदेशात अशा संधी
उपलब्ध आहेत. त्याशिवाय,
भारतात संरक्षण
क्षेत्रात काम
करायची इच्छा असेल
तर घोडेस्वारी
शिकावी लागते; आणि ती लहानपणापासूनच
शिकावी हे उत्तम.
ही आणि यासारखी
बरीच माहिती गुणेश
पुरंदरेंनी अवांतरच्या
या ताज्या सत्रात
बोलताना दिली.
घोड्याविषयीच्या
आकर्षणापलिकडे
जाऊन त्याचे अंतरंग
जाणून घेणं नक्कीच
खूप आनंदाचं ठरलं.