style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | Avantar:June 2017

 

उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची सफर

भटकंतीची आवड अनेकांना असते, पण कुठे आणि कुठल्या उद्देशाने भटकायला जायचे याबाबत प्रत्येकाचे ठोकताळे वेगळे असतात.सहसा नवी ठिकाणे पाहण्याबरोबरच खरेदी करणे हा एक प्रमुख हेतू घेऊन अनेकजण प्रवासाला जातात. या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाची सफर करायची हौस बाळगणं म्हणजे अनेकांच्या भुवया उंचावायला वाव देण्यासारखंच आहे.ते काय फिरायला जायचं ठिकाण आहे काॽ नुसताच बर्फ पहायला जाणारॽ खरेदीला काहीच नाही तिथेॽ अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करत नीना गोडबोलेंनी ही सफर सुरू केली आणि एक वेगळा अनुभव गाठीशी बांधून घेऊन आल्या.

प्रशांत आणि अटलांटिक महासागराचा संगम, त्यामुळे प्रचंड उसळणाऱ्या लाटा. ३६ अंशातफिरायला लावणारी घुसळण. सतत ३६ ते ४८ तास अशाच अवस्थेत जिथून प्रवास करावा लागतो तो आहे ड्रेक पॅसेज.हा ड्रेक पॅसेज पार केलात तरच अंटार्क्टिकाचं दर्शन होतं. आहे ना थरारकॽ

इतके सायास केल्यानंतर आपल्याला भेटतोतो, जगातलं ७ टक्के गोडं पाणी बर्फाच्या रूपात सामावून घेणारा आणि तरीही सर्वांत कोरडा असलेला अंटार्क्टिका खंड. जगातला एकमेव असा खंड जिथे कुठलाही देश वसलेला नाही आणि तरीही अनेक देशांनी त्यांचे ‘तंबू ’ मात्र रोवून ठेवलेत तिथे. पेन्ग्विन बद्दल आपल्याला बरंच कुतूहल असतं आणि ते असतातही गोंडस. पण त्या गोंडसपणाची दुसरी बाजू त्यांच्या ‘राज्यात’ जाऊनच कळते. तिथलं हवामान खूप लहरी असतं.किती वाजले हा प्रश्न निरर्थक असतो.दूरवर फक्त बर्फच दिसतो. दिसलीच तर संशोधनासाठी तिथे राहणारी माणसं, बाकी कुणीच नाही. दक्षिण ध्रुवावरचा अंटार्क्टिका अगदीच निर्मनुष्य असला तरी उत्तर ध्रुवाच्या आसपास थोडी मनुष्यवस्ती दिसते. त्यांची स्लेज गाडी, रेनडिअर, त्यांचं राहणीमान अशा अनेक गोष्टी.  शिवाय नॉर्दर्न लाईट्सची एक वेगळी जादू. मनात कुतूहल असेल तर काय आणि किती पाहू असं वाटायला लावणारं एक वेगळं विश्व त्या दोन ध्रुवांवर दिसतं. ते पहायचं आणि आयुष्यभरासाठी मनात साठवायचं.ऐकताना जे विश्व इतकं वेगळं आणि थरारक वाटतं, ते प्रत्यक्ष अनुभवण्याचा थरार कसा असेलॽ

अशीच वेगवेगळ्या विषयांची भटकंती आपण अवांतरच्या प्रत्येक सत्रात करणार आहोत. तर मग पुढच्या अवांतर मध्ये भेटूया नक्की
महिन्यातल्या अवांतर चा विषय आहे- श्वास, स्वभाव आणि प्रकृती आणि या विषयावर बोलणार आहेत डॉ. हेमांगी जांभेकर.

तर मग या आणखी एका वेगळ्या विषयासाठी १९ जुलै,२०१७ चा दिवस, संध्याकाळी पाच वाजताची वेळ नक्की राखून ठेवा.
© 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts