style2
+91 20-2523-0016
Pune, Maharashtra - INDIA
Article   | Avantar:September 2017

 

गणितातल्या गमतीजमती

 

 

 

बीजगणितात infinity साठी n-n number of things अशी संकल्पना वापरतात. पण आपल्या भारतीय वैदिक गणिताने त्या infinity च्या म्हणजे अनंताच्याही पुढे जाऊन दशअनंत ही संकल्पना शोधली होती. दशअनंत म्हणजे ९७ अंकी संख्या आणि ती इतकी मोठी संख्या त्याकाळच्या अभ्यासकांना तोंडपाठ असायची.

 

गणित फक्त अभ्यासातच नाही तर आपल्या रोजच्या जगण्यात, प्रत्येक गोष्टीत आहे. पाहण्याची नजर हवी फक्त. "उठायला उशीर झाला", "अर्धा कप चहा घेतला", "इतक्या रकमेचं पेट्रोल भरलं", "भाजी महाग मिळाली"....ही आणि अशी अनेक वाक्यं आपण रोज बोलत असतो आणि त्या प्रत्येक वाक्यात कसलं ना कसलं तरी मोजमाप आहे. जिथे हे मोजमाप किंवा गणती असते तिथे गणित येतं. अगदी रोजच्या साध्या-साध्या गोष्टींपासून ते स्थापत्यशास्त्रापर्यंत सगळीकडे गणित आपल्याला भेटत राहतं. मग जे आपल्या आयुष्यात इतकं भिनलेलं आहे त्याचा बाऊ कशाला करायचाॽ

 

"पण ती गणितातली आकडेमोड अवघड वाटते बुवा आणि ते पाढे-बिढे तर आमचे पाठ होतच नाहीत कधी!"...असं म्हणणारे अनेकजण आहेत. खरं आहे, वाटत असतील पाढे अवघड आणि आकडेमोड कटकटीची. पण जरा वेगळा विचार केला, काही क्लृप्त्या वापरल्या तर ती आकडेमोडसुद्धा सहजसोपी होऊन जाते बरं का! मग पाचअंकी संख्यांच्या बेरजादेखील चुटकीसरशी जमतात आणि ७९-८९ अशा आवाक्याबाहेरच्या वाटणाऱ्या संख्यांचे पाढेही चटकन लिहिता येतात.

 

गणित म्हणजे नुसती आकडेमोड नाही. गणिताची आवड असणाऱ्या माणसाचं तर्कशास्त्र खूप चांगलं असतं. विचारांना तर्काची जोड मिळाली की प्रयत्नवाद, आशावाद वाढतो. माणूस सकारात्मक विचार करायला शिकतो. याअर्थाने गणित एकंदरीतच आयुष्य जगायला शिकवतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

 

गणिताचे असे अनेक पैलू पोतनीस सरांनी अगदी साध्यासोप्या आणि मिश्किल शैलीत उलगडून दाखवले. खरंतर, गणिताचं हे महात्म्य समजून घेताना एक तास कसा संपला कळलंच नाही.

 

अशाच वेगवेगळ्या विषयांशी मैत्री करण्यासाठी आपण अवांतरच्या प्रत्येक सत्रात भेटणार आहोत. तर मग पुढच्या अवांतर मध्ये भेटूया नक्की!

 

दिवाळीच्या आनंदात भर घालणारं अवांतरचं पुढचं सत्र चुकवू नये असंच असणार आहे. त्यामुळे, या विशेष अवांतरसाठी  ११ ऑक्टोबर, २०१७ चा दिवसआणि संध्याकाळी पाचवाजताची वेळ नक्की राखून ठेवा.

 

Ⓒ 2016 Copyrights TranslationPanacea | All rights Reserved
Home - Services - Customers - Languages - Knowledge sharing - Careers - Contacts