अवांतर
या
उपक्रमातील
पहिला
कार्यक्रम
दि.१५.०२.२०१७
रोजी पार
पडला.त्यावेळेस,
श्री. विनायक
देसाई यांनी
जनरल
इन्शुरन्स या
विषयाची
माहिती
आपल्या सहज
शैलीत उलगडून
दाखविली.
.........Read More
March 2017
ओरिगामी
ध..मा..ल..म्हणजे
काय त्याचा
पुरेपूर
प्रत्यय
अवांतरच्या
सत्राला आला.
ओरिगामी
म्हणजे,
म्हटलं तर कागदाच्या
घड्या घालून
वस्तू
बनविण्याची
कला. पण त्या
कलेतलं कसब
काय काय
करामती करू
शकतं ते अगदी
व्यवस्थित
अनुभवायला
मिळालं.
.........Read More
April 2017
निसर्गोपचार
रोज नेमका
कोणता आहार घ्यायचा
याची माहिती
आपल्यापैकी
कितीजणांना
असतेॽ
काय, कधी,
किती
प्रमाणात, कशा
अवस्थेतलं
खावं यासारख्या
मूलभूत
गोष्टींबद्दल
आपल्याला एकतर
प्रश्न पडत
नाहीत; किंवा पडले
तरी आपण
आपापल्या
पद्धतीने त्याकडे
दुर्लक्ष
करतो आणि
जिभेचे चोचले
पुरविण्याचे
उद्योग करत
राहतो.
.........Read More
May 2017
व्यक्तिमत्त्वाला
आकार देण्याची
कला
बुद्धिजीवी
मंडळी नेहमी महत्त्व देतात,
ते प्रखर
बुद्धीला,
कलागुणांना,
कामाच्या
क्षमतेला.त्यामानाने, विशेषतः
मराठी मंडळी
आपल्या
दिसण्याला
विशेष
महत्त्व देत
नाहीत.जेव्हा आपण
संमिश्र
समूहात
वावरतो,
'तेव्हाप्रथमदर्शनात' कुणीतरीबाजी मारून जातं
आणि कष्टाने
केलेल्या
कामाची, केवळ
दर्शनी छाप न
पडल्याने कमी
दखल घेतली
जाते, असा
अनेकांचा
अनुभव असेल.
.........Read More
June 2017
उत्तर आणि दक्षिण
ध्रुवाची
सफर
भटकंतीची
आवड अनेकांना
असते, पण कुठे
आणि कुठल्या
उद्देशाने
भटकायला
जायचे याबाबत
प्रत्येकाचे
ठोकताळे
वेगळे असतात.सहसा नवी
ठिकाणे
पाहण्याबरोबरच
खरेदी करणे हा
एक प्रमुख
हेतू घेऊन
अनेकजण प्रवासाला
जातात. या
पार्श्वभूमीवर
उत्तर आणि
दक्षिण
ध्रुवाची सफर
करायची हौस
बाळगणं
म्हणजे
अनेकांच्या
भुवया उंचावायला
वाव
देण्यासारखंच
आहे.
.........Read More
July 2017
श्वास,
स्वभाव आणि
प्रकृती
तुम्ही
श्वास घेता काॽ
असा
प्रश्न
तुम्हाला
कुणी विचारलाय
काॽ विचारलाच
कधी तर तुम्ही
नक्कीच त्या
माणसाला
वेड्यात काढाल. साहजिकच
आहे ना!
जन्मापासून
मरेपर्यंत
अगदी अविरतपणे
केली जाते अशी
एकच तर गोष्ट
आहे, ती म्हणजे
श्वास घेणं. इतकी स्वाभाविक
असते ही क्रिया.
.........Read More
August 2017
घोडेस्वारी
म्हणजे काय रे
भाऊ?
"लकडी की काठी,
काठी पे घोडा..." हे
गाणं आपल्यापैकी
अनेकांनी ऐकलं
असेल आणि अनेकदा
गुणगुणलंही असेल.
खरंतर, लहानपणी
अगदी बोबडे बोल
बोलण्याच्या वयातच
हा घोडा या ना त्या
रूपाने आपल्याला
दिसतो. कधी गाण्यांतून,
बडबडगीतांमधून
तर कधी प्रत्यक्ष.
अर्थात, प्रत्यक्ष
म्हणजे खरा घोडा
पहायला मिळो ना
मिळो, पण खेळण्यातल्या
लाकडी घोड्यावर
बसण्याचा आनंद
तर अनेकांनी लुटला
असेल.
.........Read More
September 2017
गणितातल्या
गमतीजमती
गणित
फक्त
अभ्यासातच
नाही तर
आपल्या
रोजच्या
जगण्यात,
प्रत्येक
गोष्टीत आहे.
पाहण्याची नजर
हवी फक्त. тАЬउठायला
उशीर झालाтАЭ, тАЬअर्धा
कप चहा घेतलाтАЭ, тАЬइतक्या
रकमेचं
पेट्रोल भरलंтАЭ,
тАЬभाजी महाग
मिळालीтАЭ....ही
आणि अशी अनेक
वाक्यं आपण
रोज बोलत असतो
आणि त्या
प्रत्येक
वाक्यात कसलं
ना कसलं तरी
मोजमाप आहे. जिथे
हे मोजमाप
किंवा गणती
असते तिथे
गणित येतं. अगदी
रोजच्या
साध्या-साध्या
गोष्टींपासून
ते
स्थापत्यशास्त्रापर्यंत
सगळीकडे गणित आपल्याला
भेटत राहतं. मग
जे आपल्या
आयुष्यात
इतकं भिनलेलं
आहे त्याचा
बाऊ कशाला
करायचाॽ
.........Read More